राज्याने कोविड प्रतिबंधक लशीच्या ९ कोटी मात्रांचा टप्पा ओंलाडला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं ९ कोटी मात्रांचा टप्पा ओंलाडला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. राज्यात काल ६ हजार ८४८ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ७ लाख २९ हजार ५३० नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ हजार ८७० मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. यात  दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २ कोटी ७६ लाख आहे. ही संख्या देशातल्या इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं व्यास यांनी सांगितलं. राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 'कवच कुंडले अभियान' राबवलं जात आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात सर्व विभागांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना एकत्र करुन लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image