डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारर्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारर्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागास लवकरच सादर करण्यात येईल तसेच पुरस्कारार्थींच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाच्या विविध मागण्यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यासह राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाण, प्रभाकर फुलसुंदर, योगेश वागदे, विलास वंशिक, शंकर खुळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे  म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारर्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून पुरस्कारर्थींनी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण, निमआराम व आराम गाड्यातून तसेच भाडे तत्त्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवासास मान्यता देण्याबाबत गृह विभागाला दिवाळीच्या आधी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच मानधनाबाबतीत वित्त विभागाला माहिती सादर करून याबाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image