जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहन योजना जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहनाबाबत अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली आहे. देखभालीचा आणि इंधनाचा अधिक खर्च येत असलेली वाहनं मोडीत काढण्यासाठी यंत्रणा या धोरणामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये जुनं वाहन मोडीत काढल्यानंतर खरेदी केलेल्या नव्या वाहनाची नोंदणी विनाशुल्क करणं समाविष्ट राहील. यासाठीचं प्रमाणपत्र नोंदणीकृत वाहन मोडीत काढण्याच्या सुविधेद्वारे देण्यात येईल. येत्या एक एप्रिलपासून १५ वर्षे जुन्या कारचा परवाना नवीन करण्यासाठी पाच हजार रुपये तर नव्या वाहनाच्या नोंदणीचं शुल्क सहाशे रुपये राहील. पंधरा वर्षांहून जुन्या दुचाकी वाहनांच्या नोंदणीचं नूतनीकरण करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क लागेल, मात्र नव्या दुचाकींसाठी ते केवळ ३०० रुपये असेल असंही मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image