आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज अंतिम सामन्यात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि कोलकात्ता नाईट रॉयर्डस यांच्यात होणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता शारजाह इथं हा सामना सुरु होईल. काल रात्री दुबई इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेलं १७३ धावांचं आव्हान २ चेंडू आणि ४ गडी राखून त्यांनी पार केलं. या विजयात ऋतूराज गायकवाडनं ७० तर, रॉबिन उथप्पानं ६३ धावांचं योगदान दिलं.आजच्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाचा सामना येत्या बुधवारी शारजा इथं दिल्ली कॅपिटल्सशी होईल.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image