दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ, तसंच दिवाळी भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार, तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रूपये मिळणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल ही घोषणा केली. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळतो, तो आता १७ टक्के होणार असल्याचं परब यांनी सांगितलं. या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक अधिकारी- कर्मचाऱ्यांना होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणारा पगार यावेळी नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.