आर्यन खान याच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आर्यन खान याच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.मुंबईच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश वि वि पाटील यांनी आज हा निर्णय दिला. अमली पदार्थ विरोधी पथकाकडे  शुक्रवारीच अर्ज दाखल केला असल्यामुळे लवकरात लवकर जामीन मिळावा अशी विनंती आर्यन खान च्या वकिलांनी न्यायालयाला केली होती.परंतु काही आरोपींच्या जामीन अर्जाची प्रत कालच मिळाली असल्याने उत्तर दाखल करण्यासाठी किमान एक आठवडा द्यावा, अशी विनंती अमली पदार्थ विरोधी पथकातर्फे विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.