देशात सोमवारी कोविड१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६९ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १ कोटी १३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात काल कोविड-१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या देशभरात ३ लाख ९२ हजार ८८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ४२ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी २२ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशातला कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के आहे.