सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची मुख्यमंत्र्याची सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल सहकारतपस्वी, माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीच्या “प्रेरणोत्सव” कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या, महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणं कुणालाही शक्य होणार नाही. असं ते म्हणाले. एकविसाव्या शतकातली सहकार क्षेत्रापुढची आव्हानं समजून घेण्यासाठी,  या क्षेत्रातल्या उणिवा आणि दोष दूर करण्यासाठी, आणि सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषदेच्या आयोजनातून विचारमंथन घडवून आणावं, असं त्यांनी सांगितलं. सहकार हे असे क्षेत्र आहे ज्यातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात समृद्धी आणता येते. पण सहकारातदेखील बदल घडण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी सरकार खंबीरपणे सहकार क्षेत्राच्या पाठीशी उभं राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या, तसंच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जीवनकार्यावरच्या चित्रफितीचं अनावरणही झालं.

 

 

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image