राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल - चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं, नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलायच्या निर्णयाला सर्वाच्च न्यायालयानं स्थगिती दिल्याबाबत बावनकुळे यांनी बातमीदारांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोगाला संविधानानुसारच निवडणूका घ्याव्या लागतात, मात्र राज्य सरकारनं निवडणूका पुढे ढकलू असं म्हणत, ओबीसी समाजाची दिशाभूल केली, या प्रश्नावर त्यांनी निष्फळ बैठका घेत वेळकाढूपणा केला असा आरोपही बावनकुळे त्यांनी केला आहे.