एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय आर एफ, अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन या श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन मिळालं आहे. केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल २०२१ च्या मानांकनाची यादी जाहीर केली.