भारत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी नवी ओळख तयार करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, संरक्षण साहित्याचा आयातदार ही प्रतिमा पुसून टाकत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी आपली नवी ओळख तयार करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते उत्तर प्रदेशात अलीगड इथं राजा महेंद्र प्रतापसिंग विद्यापिठाच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. भारतात आता अत्याधुनिक बाँब आणि बंदुकापासून विमानं, ड्रोन्स आणि युध्द नौकांपर्यंत अत्याधुनिक युद्धसामुग्री तयार करत आहे, हे सगळं जग पाहत आहे.

उत्तरप्रदेश डिफेन्स कॉरिडॉर विकास आणि रोजगाराला चालना देईल, हा कॉरिडॉर मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग क्षेत्रांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. आतापर्यंत अलीगड मधे तयार होणारी कुलपं घरांचं रक्षण करत होती, आता अलीगड डिफेन्स कॉरिडॉरमधे तयार होणारी उत्पादनं देशाच्या सीमाचं रक्षण करतील, असं ते म्हणाले.

राजा महेंद्र प्रतापसिंग यांच्या कार्याबद्दल आदरभाव व्यक्त करताना प्रधानमंत्री म्हणाले की, राजा महेंद्र प्रतापसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्याबरोबरच त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातही खूप काम केलं आहे. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाद्वारे सरकार अशा स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जागवत आहे, असं त्यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image