सर्व क्रीडा मंत्र्यांशी अनुराग ठाकूर दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व क्रीडा मंत्र्यांशी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार असून देशभरात खेळाला चालना मिळण्यासाठीच्या मुद्द्यांवर यामध्ये चर्चा होणार आहे. टोकियो इथं ऑलिम्पिक्स तसंच पॅराऑलिम्पिक्स स्पर्धांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर भारताला खेळाच्या क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त होण्यासाठी राज्य पातळीवर प्रभावी उपाय योजना राबवण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करता येईल या मुद्द्यावर विचारविनिमय केला जाणार आहे. खेलो इंडिया आणि फीट इंडियासारख्या प्रमुख सरकारी कार्यक्रमांवर देखील संवाद साधला जाईल.