रुग्णालय आगींची गंभीर दखल, यापुढे जबाबदारी संचालकांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोणत्याही रुग्णालयांमध्ये आगीसारख्या घटना घडल्या तर त्यासाठी यापुढे रुग्णालयाच्या प्रशासनाला जबाबदार धरलं जाणार आहे. यासंदर्भातलं परिपत्रक जारी झालं. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यभरात रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक जारी केलं गेलं आहे.

अनेकदा वीज पुरवठ्यात झालेल्या बिघाड आगील कारणीभूत ठरल्याचं लक्षात घेऊन, शासकीय तसंच खाजगी रुग्णालयाच्या संचालकांनी त्यासंदर्भात अधिक अधिक काळजी घ्यावी आणि उपाययोजना कराव्यात असे निर्देशही या परिपत्रकाच्या माध्यमातून दिले आहेत. वीज पुरवठ्याची नियमितता, इमारतींचं फायर ऑडिट तसंच उद्वाहनांची सुरक्षितता यासंदर्भातले निर्देशही या परिपत्रकात नमूद केले आहेत.

शासकीय तसंच खासगी रुग्णालयातला वीज पुरवठा नियमित रहावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य मिळावं या उद्देशानं हे परिपत्रक जारी केलं असल्याचं ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image