आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित सायकल रॅली मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला तर्फे पुण्यातल्या येरवडा ते दिल्लीतल्या राजघाट पर्यंत आयोजित सायकल रॅलीनं काल धुळ्यातल्या शिरपूर इधं मुक्काम केल्यानंतर आज सकाळी मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना झाली. एसपीडीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही एम पाटील आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. विविध घोषणांनी या रॅलीला निरोप देण्यात आला. ही रॅली मुंबई- आग्रा राष्ट्रीय मार्गानं आज संध्याकाळी मध्य प्रदेशात पोचेल, अशी माहिती  सीआयएसएफ युनिटचे दिनेश चौधरी यांनी आकाशवाणीला दिली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image