राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.

रामकृष्ण मिशनच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी मिशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलला अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी तसेच मिशनच्या शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

राज्यपालांनी त्यानंतर शारदा माता मंदिराला भेट दिली व उपस्थित साधुंशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी सत्संग भजन ऐकले व नामजपात सहभाग घेतला.

रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी राज्यपालांचे स्वागत करताना आश्रमातर्फे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्याची तसेच इस्पितळाची माहिती दिली.

मठाचे सहायक सचिव स्वामी अपरोक्षानंद, व्यवस्थापक स्वामी देवकांत्यानंद, स्वामी तन्नमानंद, रामकृष्ण मिशन हॉस्पिटलचे डॉ. स्वामी दयामुर्त्यानंद व इतर साधूगण यावेळी उपस्थित होते.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image