राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल राज्यभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ६५ लाख २४ हजार ४९८ रुग्णांपैकी, ६३ लाख ४० हजार ७२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात काल २ हजार ५८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ५४६ वर पोचली आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात ४१ हजार ६७२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत काल ४४७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १५ हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख ३८ हजार ५२४ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार १९४ दिवसांवर आलाय. सध्या ४ हजार ५९५ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा १६ हजार ५८ वर पोचला आहे.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image