प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अत्याधुनिक सरदारधाम भवनाचं उद्घाटन केलं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठीचे प्रयत्न आपण सुरू ठेवले पाहिजेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्याच दिवशी २००१ मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आजचा दिवस जगभरात  मानवतेवरच्या दूर्दैवी हल्ल्यासाठी ओळखला जातो, परंतु १८९३ साली आजच्याच दिवशी शिकागो इथं झालेल्या जागतिक धर्म संसदेत, स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या मानवी मूल्यांची जगाला ओळख करून दिली असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुजरातमधल्या अहमदाबाद इथल्या अत्याधुनिक सरदारधाम भवनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सरदारधाम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत कन्या छात्रालयाची कोनशिलाही ठेवली. देशभरात सुरु असलेल्या आझादी का अमृतमहोत्सवाचा उल्लेख करत, प्रधानमंत्री म्हणाले की, सरदार पटेल यांच्या नेतृत्वात झालेल्या खेडा इथल्या सत्याग्रहातून शेतकरी, तरुण आणि गरीब वर्गातली एकता दिसून आली, यामुळे ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या माध्यमातून हीच प्रेरणा आजही आपल्या मिळते आहे असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी थोर तत्वज्ञ आणि संशोधक सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावे बनारस हिंदु विद्यापीठात तमीळ विभाग सुरु करायची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image