कोरोना विषाणू संसर्गानंतर महाराष्ट्रासह ११ राज्यांत सेरो टाइप-२ डेंग्यूचा फैलाव

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गानंतर महाराष्ट्रासह ११ राज्यांत सेरो टाइप-२ डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी कोरोना सोबतच डेंग्यू संदर्भात काल आढावा बैठक घेतली. त्यानुसार हा आजारही धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात या सर्व राज्यांसाठी केंद्रानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी रुग्ण लवकर शोधावेत आणि तापाबद्दल माहिती देणारी मदतवाहिनी सुरू करावी. चाचणी संच, अळ्या नष्ट करणारी यंत्रणा - किटकनाशकं आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा करावा, तपासणीसाठी जलद कृती दल तैनात करावं, अशा सूचनाही या बैठकीत राज्यांना दिल्या आहेत. रक्ताचा पुरेसा साठा ठेवण्याबाबत रक्तपेढ्यांना सूचना देण्यासह इतर आवश्यक वैद्यकीय साधने सज्ज ठेवावीत. घरात किंवा परिसरात, या आजाराला आमंत्रण देणाऱ्या गोष्टी कमी करण्यासह डेंग्यूची लक्षणे यासंदर्भात जनजागृती मोहिम राबवायला राज्यांना सांगितलं आहे.