नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेचे ३ मतदार संघ आणि नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरसह १४ राज्यातल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी आज पोटनिवडणूक जाहीर केली.  एप्रिल महिन्यात देगलूरचे काँग्रेसचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं होतं. त्यामुळं ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेशातलं खंडवा, हिमाचल प्रदेशातलं मंडी आणि दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याठिकाणी ८ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून १३ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३० ऑक्टोबरला याठिकाणी मतदान होईल आणि २ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल.