नितीन गडकरी यांच्याकडून दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामाची पाहणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई दिल्ली हरित क्षेत्र द्रुतगती महामार्ग एक हजार ३५० किलोमीटर लांबीचा असून तो जगातला सर्वात जास्त लांबीचा महामार्ग असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यांनी आज राजस्थानमधील दौसा इथे महामार्गाच्या बांधकामाला भेट दिली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.या महामार्गाचा ३७४ किलोमीटरचा भाग राजस्थानातून जात आहे. हा महामार्ग रणथंभोर व्याघ्र अभयारण्य, तसंच चंबळ अभयारण्यातून जात असल्यानं यावर प्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग असेल, तसंच मुकुंदरा व्याघ्र अभयारण्याखालून ४ किलोमीटर लांबीचा बोगदाही बनवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. आज त्यांनी हरयाणाच्या सोहन इथून महामार्गाची हवाई पाहणीदेखील केली.