राज्याचे आराध्य दैवत श्री गणरायांचे आज आगमन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आज गणेशोत्सव, आद्य पुजेचा मान असलेल्या गणेशाच्या मुर्तींची आज घराघरात स्थापना करण्यात येते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आज राज्यात सर्वत्र मोठ्याउत्साहात सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधनं असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्स मंडळांनी विशेष दक्षता घेतली आहे. राज्य शासनानं हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी हा उत्सव भाविकांची गर्दी टाळून तर काही ठिकाणी कमी दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे. असं असलं गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी आजपासून ते १९ सप्टेंबर पर्यंत कलम १४४ लागू केलं आहे. याद्वारे पाच पेक्षा अधिक लोकांच्या जमावाला बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहाता अनेक मंडळांनी गणेशाच्या ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली असून मंडळांनी मुखदर्शनाची व्यवस्था केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण शांतता, आनंद आणि चांगलं भविष्य घेऊन येईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानीही आज गणरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.    

राज्यावरील कोरोनाचं संकट दूर करुन महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं गणरायाला घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंगलमय वातावरणात मुंबईत उत्सवाला सुरुवात झालीय. कोरोनाच्या संकट काळातही मुंबईकरांचा उत्साह कायम आहे. मुंबईत आज सुमारे दीड लाखांहून अधिक घरगुती मूर्तींची आणि १० हजारांहून अधिक सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे.

मंगलमूर्ती गणरायाच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना मुंबईत होऊ लागली आहे. मंगलमय वातावरणात मुंबईत उत्सवाला सुरुवात झालीय. लालबागच्या राजाच्या मूर्तीची लवकरच प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोनाच्या संकट काळातही मुंबईकरांचा उत्साह कायम आहे. मुंबईत आज सुमारे दीड लाखांहून अधिक घरगुती मूर्तींची आणि १० हजारांहून अधिक सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. यंदाचा उत्सव साधेपणानं करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं असलं मुंबईकरांचा उत्साह कायम आहे. मुंबईत उत्सवासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.