मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हा दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी याबाबत माहिती दिली.नारायण राणे यांच्यावरच्याकारवाईच्या बाबतीत रत्नागिरी पोलीसांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली. रत्नागिरी पोलीस नारायण राणे यांना अटक करून, नाशिक पोलीसांच्या ताब्यात देतील त्यानंतर, नारायण राणे नाशिक पोलीस नारायण राणे यांना रत्नागिरीतल्या न्यायालयात हजर करतील असं पांडेय म्हणाले.दरम्यान, आपल्या विरोधात असा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आपल्यालानसल्याचं राणे यांनी म्हटलं आहे ते आज चिपळूण इथं बातमीदारांशी बोलत होते. माहितीच नसल्यानं मी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही, मात्र मीकोणताही गुन्हा केलेला नाही असंही ते म्हणाले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image