संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचं ऑगस्ट महिन्यासाठीचं अध्यक्षपद भारताकडे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारत स्वीकारणार आहे. या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता,आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे.

यानिमित्त आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेल्या संदेशात, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत तिरुमूर्ती यांनी भारतावरील जबाबदारीचे महत्त्व आणि जागतिक पटलावर आणण्यासाठी भारत काय प्रयत्न करेल यावर काल प्रकाश टाकला. ऑगस्ट महिन्यासाठी हे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे.