मराठवाड्यात २४३ नवीन कोविड बाधितांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात काल २४३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन, तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४३ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ५१, औरंगाबाद २०, लातूर १५, नांदेड सात, जालना सहा, तर परभणी जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रूग्ण आढळला नाही.