मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपात परिगणनेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

  श्रमकल्याण युग मासिकातून कामगार, मालक, शासन समन्वय साधण्यात येईल – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रीय हद्दीतील आयकर अधिनियम कलम 115 बीएसी अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 30 सप्टेंबरपर्यंत अधिदान व लेखा कार्यालयास पाठवावीत असे आवाहन सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांनी केले आहे.

आयकर अधिनियम कलम 115 बीएसी अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी नवीन  करपद्धती (New Tax Regime)  व जुन्या कर पद्धतीने (Old Tax Regime) करआकारणी असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.जे निवृत्तीवेतनधारक यामधील कर निवडीविषयी विहित वेळेत अधिदान व लेखा कार्यालयास कळविणार नाहीत त्यांची जुन्या कर पद्धतीने (Old Tax Regime)  आयकर वसुली केली जाईल. टॅक्सधारकांनी निवडलेला Tax Regime पर्याय व त्यासाठी आवश्यक असणारी आयकर वजातीस पात्र बचत तसेच गुंतवणूक प्रमाणपत्रे व पावत्या अधिदान व लेखा कार्यालयास आपले संपूर्ण नाव, पीपीओ नंबर बँक व ब्रँच सहीत apaopensdat.mum-mh@gov.in या ई-मेल आयडीवर  30 सप्टेंबर 2021 पर्यंत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.वित्तीय वर्ष 2021-22 करीता ज्या निवृत्तीवेतनधारकांची अंदाजित स्थूल वार्षिक निवृत्तीवेतन रक्कम रु. 6,50,000/- पेक्षा जास्त आहे त्यांची आयकर वसुली त्यांच्या मासिक निवृत्तीवेतनातून समप्रमाणात सुरु करण्यात आलेली आहे.

तरी निवृत्तीवेतनधारकांनी आपली माहिती सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा),अधिदान व लेखा कार्यालय, लेखा कोष भवन, ए विंग, पहिला मजला,कौटुंबिक न्यायालय व एमएमआरडीए कार्यालयाजवळ, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051. सादर करण्यात यावीत असे एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image