लसीकरण मोहीमेला योग्य प्रतिसाद मिळत असल्यामुळेच देशानं ५० कोटी लसीकरणाचा टप्पा केला पार : प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला योग्य प्रतिसाद मिळत असल्यामुळेच देशानं ५० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 'सबको व्हॅक्सिन मुफ्त व्हॅक्सिन' मोहीमे अंतर्गत सर्व देशवासियांच लसीकरण लवकरच पूर्ण होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमे अंतर्गत देशभरात आजवर ५१ कोटी ६६ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशभरात सुमारे ५५ लाख ५२ हजार मात्रा उपलब्ध केल्या जाणार आहेत.