कुठल्याही मिरवणुकांशिवाय साध्या पद्धतीने मोहरम करण्याचे राज्य सरकारचे आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन  राज्याच्या गृह विभागाने केले आहे. कोविड काळात झालेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम करु नये, असं गृह विभागानं  कळवलं आहे.