बिहार, उत्तर प्रदेशमध्ये पूरस्थिती गंभीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या 23 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे, मात्र प्रयागराज, वाराणसी, भदोही, गाझियापूर आणि बलिया या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पूरग्रस्त वाराणसीला भेट दिली. प्रशासनाने उभारलेल्या छावण्यांचीही त्यांनी पहाणी दिली. गंगा आणि वरुणा नद्यांमधली पाण्याची पातळी वाढल्यामुळे इथे पूर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतल्या परिस्थितीचा आढावा 2 दिवसांपूर्वी घेतला होता. बिहारमध्ये पूरस्थिती बिकट होत असून पाटणा, बक्सर, मुंगेर, भोजपूर आणि भागलपूर सह बारा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागांमध्ये तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातल्या सहाशे गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image