देशात काल ५७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५२ कोटी ९५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ५७ लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना आतापर्यंत ५५ कोटी कोविड मात्रा उपलब्ध करून दिल्याचं केंद्र सरकार कडून कळवण्यात आलं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी दवाखान्यांकडे असे २ कोटी ८२ लाख मात्रा अजूनही शिल्लक असल्याचं आरोग्य  मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, देशात काल नव्या ४० हजार १२० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, देशात काल ४२ हजार २९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ कोटी १३ लाख २ हजार ३४५ झाली आहे.