शेतकरी हितासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टोमॅटो खरेदीची सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोमॅटोचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकरी हितासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली. त्या काल नाशिक इथं बोलत होत्या. डॉ. पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल तसंच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना नाशिक इथून टोमॅटोच्या दरासंदर्भात माहिती दिली त्यानुसार केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू शकेल त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा केंद्र आणि राज्य सरकार पन्नास- पन्नास टक्के आर्थिक भार उचलेल, असंही पवार यांनी सांगितलं.