मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, लोकशाहीर अण्णा भाऊंनी स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आहे. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना शब्द आणि आवाज देतानाच त्यांनी चळवळीत चैतन्य जागवले. अस्सल मराठी मातीतील त्यांच्या साहित्याने सातासमुद्रापार ओळख निर्माण केली. महाराष्ट्र सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image