राज्यात पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

 

मुंबई : राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.

आत्तापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. 15 एप्रिल ते 7 ऑगस्ट या काळात 1 कोटी 72 लाख 32 हजार 695 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

जुलै महिन्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विशेष धोरण अवलंबून पूरग्रस्त भागात मोफत 92,017 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले.म्हणजे आत्तापर्यंत एकूण 1 कोटी 73 लाख 24 हजार 712 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. राज्यात सद्यस्थितीत 1164 शिवभोजन केंद्र सुरू आहेत.

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image