पणजी येथे गोवास्टार्टअप व्यापारी संमेलनाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी गोवास्टार्टअप व्यापारी संमेलनाचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल पणजी इथं उद्घाटन करण्यात आलं. गोवा स्टार्टअप सेल आणि गोवा व्यस्थापन संस्थेनं संयुक्तपणे या संमेलनाचं आयोजन केलं आहे. माहिती तंत्रज्ञान धोरण २०१८ आणि स्टार्टअप धोरण २०१७ मुळे नोंदणीकृत गोव्यातील स्टार्टअप उद्योगांना १८० कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला असून या स्टार्टअप धोरणाअंतर्गत सुमारे एक कोटी ४७ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. अशी माहिती सावंत यांनी यावेळी बोलताना दिली.