राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आदेश जाहीर करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आज आदेश जाहीर करण्यात येतील. त्यानुसार कोरोना संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यांमधली दुकानं ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. राज्यातले निर्बंध टप्प्याटप्प्यानं खुले केले जाणार असून सध्यातरी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.