केंद्रसरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्यावतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराच नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीटर संदेशाद्वारे दिली. मेजर ध्यानचंद हे देशातील सर्वोच्च खेळाडूंपैकी एक होते आणि त्यांनी आपल्या क्रीडा कर्तृत्वाद्वारे देशाचा गौरव वाढवला आहे, हा खेल रत्न पुरस्कार समर्पित करावा असा आग्रह अनेक देशवासियांचा होता त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हंटल आहे.