२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालिका प्रिया अब्राहम म्हणाल्या की, मुलांमध्ये कोवक्सिनच्या टप्पा २ आणि ३ च्या चाचण्यांचे निकाल लवकरच नियंत्रकांसमोर सादर केले जाणार आहेत. तर झायडस कॅडिलाची लस देखील लवकरच उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे. एनआयव्हीने कोरोना विषाणूचा स्ट्रेन वेगळा करून भारत बायोटेक कंपनीला दिल्यानंतर कंपनीनं कोवक्सिन लस विकसित केली. एन आय व्ही नं पूर्व नैदानिक चाचण्या तसंच प्रत्यक्ष निदान आणि प्रयोगशाळेच्या सहाय्याने सर्व टप्प्यांवर यासाठी मदत केली आहे.