भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार टक्के तर रिव्हर्स रेपो दर तीन पूर्णांक ३५ टक्के कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाला चालना मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं दास यांनी सांगितलं. वर्ष २०२१-२२ साठी सकल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज नऊ पूर्णांक पाच टक्के इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. तिसऱ्या तिमाहीत खरिपाचं पीक आल्यावर पुरवठा वाढेल आणि महागाई थोडी कमी होईल, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला.