केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळेल. १ जुलै २०२१ पासून ही वाढ लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.