महिलांच्या क्रिकेटमध्ये ५० षटकांच्या मालिकेत इंग्लंडची भारतावर निर्विवाद आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये सुरु असलेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लडनं भारताचा ५ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली. सुरुवातीला फलंदाजी करत भारतीय संघानं इंग्लंडपुढे २२२ धावांच लक्ष्य ठेवलं होतं. टाऊनटन इथं झालेल्या या सामन्यात भारताच्या शाफाली वर्मानं ४४ धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून सोफिया डंकलेनं ७३ आणि कॅथरीन बंटनं ३३ धावा नाबाद केल्या. ३४ धावा देत ५ गडी बाद करणाऱ्या इंग्लंडच्या केट क्रॉसलंला सामनावीर घोषित करण्यात आलं. मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना परवा ३ जुलैला इंग्लंडमधल्या वॉरेस्टर इथं खेळला जाणार आहे.