वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर ला होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. अर्ज भरण्याची प्रक्रिया आज संध्याकाळी पाच वाजेपासून सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं. या परीक्षेसाठी यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.