ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज सकाळी पुणे इथे निधन झाले. आपल्या १५ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावली. त्यांनी सहा वेळा एकेरीतले राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले. प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. भारतीय क्रीडा इतिहासात नाटेकर यांचे विशेष स्थान असून त्यांचे यश नवोदित खेळाडूंना कायम प्रोत्साहित करत राहील, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.