मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरुप विधानसभेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे सभागृहाचं कामकाज सभापतींना दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. आज कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित करत, विधानभवनाच्या पायऱ्यांवर ज्या पद्धतीनं विरोधकांनी माईक वापरला, घोषणाबाजी केली, पत्रकं वाटली, काही लोकांना आत प्रवेश दिला, यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, यासंदर्भात माहिती मिळायला हवी अशी विचारणा केली. अशा प्रकारचं धाडस वाढलं तर विधिमंडळाच्या पावित्र्यावर आणि अधिकारावर शंका उपस्थित होईल, असं ते म्हणाले.
दरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवरसुरू असलेली समांतर विधानसभा तात्काळ बंद करून माईक जप्त करण्याचे आदेश पीठासीन अधिकारीभास्कर जाधव यांनी दिले. आज सभागृहात विरोधकांनी उपस्थितन राहता बाहेर पायऱ्यांवर समांतर सभागृह चालवलं होतं. सभागृहात सकाळी ११ वाजता कामकाजसुरू झालं त्यात सर्व कागदपत्रं पटलावर ठेऊन झाली.
धर्मादाय रुग्णालयाबाबतचा दुरुस्तीचाप्रस्ताव, तसंच अर्णब गोस्वामी, कंगना रनौतयांच्याविरुद्ध मांडलेल्या विशेषाधिकार भंग प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी समितीचामुदत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर, सभागृहाबाहेरसुरू असलेल्या समांतर सभागृहाचा विषय जाधव यांनीच उपस्थित केला. हे सुरू असतानाच अपक्षआमदार रवी राणा हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीचा बॅनर घेऊन थेट अध्यक्षांच्या आसनासामोरगेले. असं करणं योग्य नाही, असं सांगत पीठासीन अधिकारी जाधव यांनी त्यांना चर्चेत भागघ्यायला सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. शेवटी त्यांना मार्शलकरवी बाहेर काढण्याचेनिर्देश जाधव यांनी दिले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.