केंद्राने दिल्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ३७ कोटी मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आतापर्यंत लसीच्या ३७ कोटी मात्रा राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत. लवकरच आणखी २३ लाख ८० हजार मात्रांचा पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. लसीकरणाचा वेग वाढवून कोविड १९ वर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सरकार करत आहे.