राज्यात मंगळवारी सुमारे ११ हजार रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ९७८  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ७ हजार २४३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल नंदुरबार, भंडारा, आणि गोंदिया, या जिल्ह्यांमध्ये, तसंच धुळे महानगरपालिका क्षेत्रात एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ७२ हजार ६४५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५९ लाख ३८ हजार ७३४ रुग्ण बरे झाले.  तर, १ लाख २६ हजार २२० रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ लाख ४ हजार ४०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक २१ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ४ शतांश टक्के आहे. मुंबईत काल ६०० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालय़ातून सुटी दिली. काल ४४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ९२५ दिवसांवर आला असून काल ८ रुग्णांचा मृत्यू झाला