भारतात एकूण ४० कोटी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली - केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात एकूण ४० कोटी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात एकूण ३९ कोटी ९३ लाख ६२ हजार ५१४ जणांना कोविड प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. कोविड लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा २१ जूनला सुरू करण्यात आला होता आणि काल एकाच दिवशी ३८ लाख ७९ हजार लसीचे डोस देण्यात आले.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, १८ ते ४४ वयोगटातल्या लोकांसाठी काल १६ लाख ३५ हजारांहून अधिक लसीचे पहिले डोस देण्यात आले तर २ लाख ११ हजार दुसरे डोस देण्यात आले. लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून, ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या आणि १८ ते ४४ वयोगटातल्या १२ कोटी १६ लाख लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून ४५ लाख ९८ हजाराहून अधिक लोकांना दुसराही डोस मिळाला आहे.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, बिहार, गुजरात आणि कर्नाटक या राज्यात ५० लाखाहून अधिक १८ ते ४४ वयोगटातल्या लोकांना कोविड लसीचा पहिला डोस दिला आहे. आंध्रप्रदेश, आसाम, छत्तीसगढ, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगण, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांत १८ ते ४४ वयोगटातल्या १० लाखांहून अधिक लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image