जम्मू आणि काश्मीर चकमकीत दोन दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील शौपिया जिल्ह्यातील सादिक खान भागात काल संध्याकाळी सुरक्षा बलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबा चा कमांडर इशफाक दार उर्फ अबू अक्रम याचा समावेश आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि स्फोटकं हस्तगत करण्यात आली.