प्रधानमंत्र्यांची आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडस्थितीबाबत चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. या राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीचा मोदी आढावा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह सचिवांनीही ईशान्य भारतातल्या राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, या राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. 

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image