भारताची इन्व्हेस्ट इंडिया ठरली जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन संस्था

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्व्हेस्ट इंडिया या भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी कंपनी जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी ठरली आहे. मेक एन इंडिया अभियानाअंतर्गत इन्व्हेस्ट इंडिया भारतात गुंतवणुक करू इच्छिणार्या  सर्वासाठी व्यवसाय उभारणी पासून विस्तारापर्यंत मार्गदर्शकाची भुमिका पार पाडते.

तिला पुरस्कार मिळाल्याबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इन्व्हेस्ट इंडिया कंपनीचं अभिनंदन केलं आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यात भारत सातत्यानं आघाडीवर राहिला आहे. या विपरित परिस्थितीतहि गुंतवणुकीची नवनवीन क्षेत्रं निर्माण करुन शाश्वत गुंतवणूक आकर्षित करण्यात भारतानं बाजी मारली असल्याचं गोयल यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे.