विधिमंडळात उत्कृष्ट कामकाज केल्याबदल बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणसाठी पुरस्कार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल बारा सदस्यांना काल राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेनं उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणसाठीचे पुरस्कार देऊन गौरवलं. यात विधानपरिषदेच्या सहा आणि विधानसभेच्या सहा सदस्यांचा समावेश आहे. 

विधानपरिषद सदस्यांमधे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सन २०१५-१६ साठी अनिल परब यांना, २०१६-१७ साठी विजय ऊर्फ भाई गिरकर यांना, तर २०१७-१८ साठी संजय दत्त यांना मिळाला. उत्कृष्ट भाषण पुरस्कार २०१५-१६ साठी राहूल नार्वेकर, २०१६-१७ साठी कपिल पाटील, तर २०१७-१८ साठी प्रवीण दरेकर यांना मिळाला.

विधानसभा सदस्यांमध्ये उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सन २०१५-१६ साठी डॉ. अनिल बोंडे, २०१६-१७ साठी उत्कृष्ट  सुभाष साबणे, तर २०१७-१८ साठी राहुल कुल यांना मिळाला. तर, उत्कृष्ट भाषण पुरस्कार २०१५-१६ साठी वर्षा गायकवाड, २०१६-१७ साठी राजेश टोपे, तर २०१७-१८ साठी धैर्यशील पाटील यांना मिळाला.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.