तमिळनाडू राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधीत १२ जुलैपर्यंत वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधी १२ जुलैपर्यंत वाढवल्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी काल जाहीर केलं. मात्र हे करताना काही निर्बंध शिथिलही केले आहेत. राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई पासची आवश्यकता नसेल, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.